|

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोटी माहिती दिली – चंद्रकांत पाटील

Devandra Fadnavis
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: आज भाजपचा स्थापनादिन यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही पाटील यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी महाविकासआघाडी सरकार हे त्यांच्या कर्माने मरेल, अशा शब्दांत हल्लाबोल केला.
राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली. जनता ही फसवणूक खपवून घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
तसेच या कार्यक्रमात बोलताना, आपल्याला राज्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज आहे. देशात स्लीपर सेलचे लोक सक्रिय असल्याचे कोरेगाव-भीमाच्या दंगलीवेळी दिसून आले. त्यामुळे आपल्याला वैचारिक संघर्ष करावा लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

पुण्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
पुण्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार आता महापालिकेने नवीन निर्बंध लावले आहेत. त्यानुसार अगोदरच्या आदेशानुसार सगळे ६ वाजता बंद होणार आहे. फक्त सुरू करण्याच्या वेळेत बदल केला असून सकाळी ६ ऐवजी ७ वाजता उघडणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या आदेशात नमूद केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *