|

लॉकडाऊनला विरोध करणारं; उदयनराजेंचं ‘भीक मांगो’ आंदोलन!

Udayan Raje's 'Beg' movement opposing lockdown!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

सातारा: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला यापूर्वीच पूर्णपणे विरोध दर्शविला होता. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी याआधीही ठणकावून सांगितले होते.
लॉकडाऊनला विरोध करताना आज भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केलंय. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर आंदोलन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत कटोरा ठेऊन त्यांनी या भीक मांगो आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजेंनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर टीका केली.
सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान दोन दिवसीय पूर्ण लॉकडाऊनला साताऱ्यात चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळालाय मात्र या लॉकडाऊनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.भीक मांगो आंदोलन करत जमा केलेले ४५० रुपये घेऊन उदयनराजे यांनी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे जमा केली. राज्य शासनाने विकेंड लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा असंही उदयनराजेंनी शेवटी स्पष्ट केलं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *