वनमंत्र्यासाठी विदर्भातील दोन नावे चर्चेत
अधिवेशना नंतरच मंत्रीपदाचा होऊ शकतो विचार
पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. रिक्त झालेल्या मंत्रीपदावर विदर्भातील शिवसेनच्या दोन आमदारांचे नाव आता समोर येत आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे वन खात्याचा पदभार असणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांचे नाव वनमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. त्याच बरोबर अकोल्याचे विधानपरिषदेचे आमदार गोपीकिशन बिजोरीया यांचे नाव चर्चेत आले आहे.
संजय राठोड यांच्यासह विदर्भातून शिवसेनचे ४ आमदार निवडून आले आहेत. तीन वेळा निवडून आलेले मेहकरचे आमदार डॉ. रायमुलकर यांचे नाव वनमंत्री पदासाठी घेण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात दोन आमदार आहेत. महाविकास आघाडी मध्ये शिवसेनच्या वाट्याला कमी मंत्रिपद आल्याने डॉ. रायमुलकर यांची मंत्रीपदी निवड होऊ शकली नाही. रायमुलकर यांना पंचायत राज समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. याच बरोबर रामटेक येथून अपक्ष निवडून आलेले आशिष जयस्वाल यांचे नाव सुद्धा चर्चेत आले आहे.
विधानपरिषदेचे आमदार गोपीकिशन बिजोरीया यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. १ ते १० मार्च दरम्यान आर्थिक अधिवेन पार पडणार आहे. अधिवेशना नंतरच मंत्रीपदाचा होऊ होणार आहे.