Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचारोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात ट्विटर वॉर; 'केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व…'

रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात ट्विटर वॉर; ‘केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व…’

मुंबई : देशात व राज्यात कोरोनाची परिस्थीती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. मोठ्या संख्येने नवीन रुग्णांची वाढ होत आहे तर, मरणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा जास्त आहे. दरम्यान यावरुन राज्य व केंद्रामधील सरकार आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचे कामकाज कोरोना काळातही चालू राहील असे सांगितले असता त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संसद भवन महत्वाची की, देशातील नागरिकांचा जीव महत्वाचा असा सवाल उपस्थीत केला होता. आमदार रोहित पवार यांनी देशातील लसीकरणाचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाना साधला केवळ पवार आडनाव एवढंय आपलं कर्तृत्व आहे. हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल असे ट्विट त्यांनी केले आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, ”राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या
शरद पवार यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी हे जरा अतीच नाही का रोहित पवार ? केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल.” दरम्यान आमदार रोहित पवार व अतुल भातखळकर यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपल्याचे दिसून आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विट द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली यामध्ये ते म्हणाले की, देश व राज्यावर कोरोना महामारीचे संकट आहे. असे असताना दिल्लीत हजारो कोटींच्या नव्या संसद भवनाचे काम सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे. असे मत आमदार रोहित पवार यांनी मांडले यावर अतुल भाककळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले की, ”मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी.”

पुढे हे ट्विटर युद्ध चालू असताना यावर आमदार रोहित पवारांनी पुन्हा ट्विट केले आणि म्हणाले… ”युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? Thinking face भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच.” दरम्यान या ट्विटर युद्धाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments