” ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच ट्रेलर रिलीज: ३ वर्षांनंतर पुन्हा दिसणार श्रद्धा कपूर”

" 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच ट्रेलर रिलीज: ३ वर्षांनंतर पुन्हा दिसणार श्रद्धा कपूर"
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

‘बागी’ आणि ‘आशिकी २’ या सारख्या चित्रपटांमध्ये मोठ्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारी श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा “तू झूठी मैं मक्कार” चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल ३ वर्षांनंतर श्रद्धा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे . श्रद्धाचा शेवटचा चित्रपट ‘बागी २’ २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर श्रद्धा केवळ ऍडव्हर्टीसमेंट मधून प्रेक्षकांना दिसली होती.

‘तू झूठी, मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘सोनू के टिटू कि स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनामा’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ‘लव रंजन’ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा सुद्धा दिग्दर्शक लव रंजन आणि राहुल मोदी यांनी एकत्र लिहिलेली आहे.

श्रद्धा आणि रणबीर सोबत ‘तू झूठी, मैं मक्कार’ या चित्रपटामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी, डिम्पल कपाडिया, अजय देवगन असणार आहेत. या चित्रपटाला संगीत प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी दिले आहे. हा चित्रपट ‘लव फिल्म्स आणि टी-सीरीस’ च्या निर्मिती संस्था अंतर्गत प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटामध्ये श्रद्धाचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलर ने चित्रपटामध्ये असणारे बोल्ड दृश्यांचा वापर केल्याच दिसत आहे. चित्रपट रोमांस आणि कॉमेडी शैलीचा असणार आहे. हा

चित्रपट “एक मक्कार आशिक” आणि “एका खोटारड्या” मुलीची गोष्ट आहे असे ट्रेलर मधून कळण्यात येते. या दोन पात्रांची प्रेम कहाणी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

ट्रेलर बघता हा चित्रपट परिवारासोबत बघू शकण्याची शक्यता कमी दिसत आहे. ट्रेलर मध्ये रणबीर एक मिश्किल आणि बिंदास मुलाची व्यक्तिरेखा साकारतोय. रणबीरच्या पात्राला प्रेम करण्यापेक्षा जास्त अवघड त्यातून बाहेर पडणं वाटत असते.

रणबीरच्या पात्रामुळे प्रेक्षकांना ‘सोनू के टिटू की स्वीटी’ मध्ये सोनूची भूमिका साकारणाऱ्या कार्तिक आर्यनची आठवण होऊ शकते. रणबीर आणि कार्तिकच्या पात्रांमध्ये बऱ्याचअंशी साम्य आधडते. त्यांच राहणीमान, संवाद, संवाद फेक आणि एकुणात मुलीला धडा शिकवण्याची इच्छा या सगळ्या गोष्टींमुळे दोन चित्रपटांमधले साम्य सध्यातरी दिसत आहे. श्रद्धाच पात्र सुद्धा थोडे थोडे ‘सोनू के टिटू की स्वीटी’ याच चित्रपटामधल्या ‘नुसरत भारूचा’ उर्फ ‘स्वीटी’ या पात्राशी मिळते जुळते आहे.

दोन चित्रपटांमध्ये असलेल्या साम्यचे कारण कदाचित दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक ‘लव रंजन’ असू शकतात. साम्य असले तरी दोन्ही चित्रपट एकमेकांपेक्षा कितपत वेगळे आहे हे ८ मार्चला कळणारच आहे. श्रद्धाच्या चाहत्यांची या चित्रपटा बद्दल असणारी उत्सुकता त्यांच्या सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *