मुख्यमंत्री सत्यवादी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत–संजय राऊत
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत. ते डोळे लावून बसलेले नाही. कोण काय करत आहे याकडे ते लक्ष ठेऊन असतात. मुख्यमंत्री चुकीच्या गोष्टीला पाठीला घालणार नसल्याचा पुन्हा एकदा शिवसेनचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी ते बोलत होते. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री शांत बसून नाहीत. राज्यात काय घडते याबाबत ते अनभिज्ञ नाहीत. त्याचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. ते फार जागरूक आहे. कुठल्याही गोष्टीचा तपास होऊ द्या त्यानंतर त्यावर बोलावे. न्यायप्रिय मुख्यमंत्री आहेत. कोणावरीही अन्याय होवू देणार नाहीत.
सरकारकडे नसणारे पुरावे जर तुमच्याकडे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावे. कोणीही राजकारणासाठी अशा गुन्ह्याचा उपयोग करून नये. न्याय मिळाला नाही तर मग या मार्गाचा उपयोग त्यांनी करावा असा सल्ला राऊत यांनी चित्रा वाघ यांना दिला.
बाळासाहेब असते तर त्यांनी या प्रकरणात वेगळा निर्णय घेतला असता. मात्र नेत्या नेत्या मध्ये फरक असतो हे पाहायला हवे. हे सरकार तीन पक्षाचे मिळून तयार झाले आहे याचा विचार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विरोधकांनी विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवायला हवा. अधिवेशन उधळून लावण्याच बोलण्यात येत आहे. हा विरोधकांचा अजेंडा आहे. खरे तर जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडायला हवे. आंदोलन करायचे असेल तर इंधन दरवाढी विरोधात करावे आम्ही त्यांच्या सोबत असू असा खोचक टोला सुद्धा त्यांनी यावेळी केला.