Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचा‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाड अस का म्हणाले?

‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाड अस का म्हणाले?

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कवितेतून भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन विरोधात भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करत आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी कवितेची मदत घेतली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे अस शीर्षक असेलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली आहे. उपरोधिक शब्दात भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ही कविता साध्य सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

कधी थाळ्या वाजवायला

लावल्या नाही…

ना कधी मेणबत्या आणि दिवे

लावायला लावले …..

निर्णय घेताना घेतले

विश्वासात…..

विरोधकांचे त्यामुळेच

फावले…….

शांत राहून तो लढत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

मंदिर उघडा, बाजार उघडा

शाळा उघडा ते म्हणाले…..

परीक्षा पुढे ढकलल्या तर

ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….

कोरोना वाढला तर ते आता

फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

इमान तर विकले नाहीच

ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..

कोरोनाचे आकडे लपवले नाहीच

खोट्याने न कधी माना झुकल्या….

घरी पत्नी आणि मुलगा

आजारी असतांना तो मात्र लढत आहे….

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

ना कुठे बडबोले पणा

ना कशाचा बडेजाव..

आठ हजार कोटीचे

विमान नको….

ना कोणत्या प्रकरणात

घुमजाव……

जे करतोय ते प्रामाणिक पणे

तो करतो आहे…..

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…

विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….

गोर गरीब जनतेला

एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….

निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट

शेतकऱ्यांच्या अडचणी

साठी तो शांततेत लढतो आहे ……

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!

ना क्लीन चिट देता आली…

ना खोटी आकडे वारी देता आली…

निवडणूक काळात तर कधी

ना अशक्य घोषणा त्याला करता आली…

जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

महाराष्ट्राचे मीठ खाऊन

निधी पंतप्रधान निधीला ते देताय…

उठ सूठ, सकाळ संध्याकाळ

ते टीका सरकार वर करताय…..

तो मात्र टिकेला उत्तर न देता

सर्वसामान्यांसाठी झटत आहे…

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

– डॉ.जितेंद्र आव्हाड

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments