हातात त्रिशूळ, कपाळावर भस्म : अजयच्या “भोला” चा टीजर रिलीज

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अजय देवगन आणि तब्बूचा ३० मार्चला प्रदर्शित होणार “भोला” चे दुसरे टीजर आज लाँच करण्यात आले. टीजर बघताना चित्रपट काहीतरी भव्य आणि थ्रिल असणार आहे असे दिसते. ‘भोला’ या चित्रपटाच्या दुसऱ्या टीजरमध्ये अजय देवगनच्या हातात त्रिशूळ आणि कपाळावर भस्म बघून हे कळतंय की अजय महादेवचा भक्त या चित्रपटामध्ये असणार आहे.

अजयसोबतच या चित्रपटामध्ये तब्बू वर्दीमध्ये दिसतीये आणि ‘तनु वेड्स मनू’ चित्रपटामधून ‘पप्पी जी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दीपक डोब्रियाल एक वेगळ्याच रूपात दिसणार आहेत. अजय देवगन, तब्बू, दीपक डोब्रियाल सोबतच गजराज राव, संजय मिश्रा, राई लक्ष्मी आणि मकरंद देशपांडे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एका वडिलांची त्याचा मुलीसोबत पहिल्यांदा भेटायची गोष्ट आहे आणि त्यासाठी एका रात्रीत घडणाऱ्या घडामोडींची ही गोष्ट आहे.

टीजरमध्ये अजय गुंडांना मारताना दिसतो आहे. टीजरमधून तरी असे दिसतंय या चित्रपटामध्ये उत्तम ऍक्शन सीन्स आहेत. ऍक्शन चाहत्यांसाठी हा चित्रपट मेजवानी ठरू शकतो. हा चित्रपट अजयचा असल्याने प्रेक्षकांना उत्तम दर्जेचे स्टंट्स अनुभवायला मिळणार आहेत.

टीजरमध्ये तब्बू पोलीस ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. “लोग ये क्यू भूल जाते है… इसी वर्दी के पीछे भी एक इंसान होता है…” असे दर्जेदार संवाद प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. भोला २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या कैथीचा अधिकृत रिमेक आहे. कैथी चित्रपट तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

कैथी या चित्रपटाची गोष्ट एका माजी दोषीच्या आयुष्यावर आधारित होती. एक माणूस तुरुंगातून बाहेर निघून त्याचा मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी निघतो आणि त्या रात्री त्याच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी यानुसार हा सिनेमा पुढे सरकत राहतो. कैथी चित्रपटाच्या निर्मात्याने जरी भोलाला रिमेकचे अधिकार दिले असले तरी हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडेल यात जरा शंका आहे.

कैथी चित्रपट हिंदी मध्ये डब झालेला आहे. यामुळे प्रेक्षकांचा भोला या चित्रपटाला किती आणि कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल. अजयने दिग्दर्शक म्हणून भोला या त्याच्या चौथ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या आधी अजयने ‘यू ,मी और हम'(२००८), ‘शिवाय’ (२०१६), ‘रन वे ३४’ (२०२२) या चित्रपांचे दिग्दर्शन केले आहे.

या टीजरने चाहत्यांसाठी उत्सुकता अजून वाढवली आहे असे म्हणता येईल. या पूर्वी अजयने याच चित्रपटाचे एक टीजर रिलीज केले होते ज्यामध्ये त्याच्या मुलीच्या पात्राबद्दल इंट्रोडक्शन देण्यात आले होते. कैथीमधील कार्थीच्या भूमिकेला अजयने कितपत न्याय दिला आहे हे ३० मार्चला कळेल. मात्र, टीजरने प्रेक्षकांची आतुरता वाढवली आहे हे खरं. भोला हा चित्रपट प्रेक्षकांना ३D मध्ये अनुभवायला मिळणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *