Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचानागपूर मध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे रुपांतर कोविड रुग्णालयात

नागपूर मध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे रुपांतर कोविड रुग्णालयात

नागपूर : सध्या नागपूर मध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. बेड उपलब्ध नाही, औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन कमी पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थिती केंद्रीय नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परीने काही मदत करायचे हे ठरविले आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे कॅन्सर रुग्णासाठी स्थापन करण्यात आले आहे. मात्र, आताची कोरोनाची परिस्थिती पाहता या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरु करण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. इन्स्टिट्यूट मध्ये  नागरिकांना ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर आणि आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता ६० बेड सुरु होईल. लवकरच १०० बेड इथे सुरु होतील आणि पुढच्या आठवड्यात २०० बेडची व्यवस्था नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सुरु होतील अशा विश्वास फडणवीस यांनी बोलून दाखवला. २० आयसीयू आणि ३० व्हेंटीलेटर या रुग्णालयात सुरु होतील. सुविधांचा मोठा गॅप पडत असून तू हळूहळू भरून काढण्यात येईल. सिटीस्कन सुद्धा बसविण्यात येणार आहे.

गरिबांची सेवा करण्यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरु करण्यात आली आहे. पैसे कमविणे हा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हेतू नव्हता. सरकारने ठरविल्या पेक्षा कामी पैशात येथे उपचार होतील असे फडणवीस यांनी सांगितले.

ऑक्सिजन मिळवून देण्यात नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. स्टील निर्मिती करणाऱ्या कंपन्याकडे ऑक्सिजन असते, त्याबाबत नितीन गडकरी यांची कंपन्यासोबत बोलणी झाली असून पुढील तीन ते चार दिवसात ऑक्सिजन उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments