Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचा‘द बिग बुल’ चा ट्रेलर प्रदर्शित !

‘द बिग बुल’ चा ट्रेलर प्रदर्शित !

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या नवनवीन भूमिकांसाठी खूप चर्चेत आहे. अभिषेक बच्चन याच्या आगामी ‘द बिग बुल’ या चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले होते. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिषेक बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट ८ एप्रिलला डिजनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद मेहता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. गुरु चित्रपटात धीरूभाई अंबानीची भूमिका साकारणारा जुनिअर बच्चन आता प्रेक्षकांना ‘हर्षद मेहता घोटाळ्या’ची पडद्यावर आठवण करून देणार आहे. १९९० ते २०००च्या दरम्यान शेअर बाजारात झालेला घोटाळा आणि संपूर्ण शेअर मार्केटला हादरवून टाकणारे घोटाळे या चित्रपटात दाखवले जातील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोकी गुलाटी यांनी केले असून, यात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अजय देवगन आणि आनंद पंडित निर्मित करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. अभिषेक शिवाय इलियाना डिक्रूझ, सोहम शाह आणि निकिता दत्तादेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

नुकताच ‘द बिग बुल’ या चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ३ मिनिट ८ सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘इस देस मैं हम कुछ भी कर सकते है’ असे बोलताना दिसत आहे. चित्रपटातील अभिषेकचा हटके अंदाज आणि लूकवर चाहते फिदा झाले आहेत. या ट्रेलरमध्ये हर्षद मेहता यांचा सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण ते भारतातील सर्वात मोठा स्टॉक इन्वेस्टर होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्याच आला आहे.

याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली. त्यामुळे चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments