आजच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार

मुंबई: राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. कडक निर्बंध लावून सुद्धा परिस्थिती आटोक्यात येत नाही. यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोना रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलाविली आहे. याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी उपस्थित राहणार आहे.
आज पासून विकेंड लॉकडाउन करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजे पर्यंत लॉकडाउन असणार आहे.