फडणवीसांवर टीका करणे भोवले; शिवसेनेच्या आमदाराविरोधात तक्रार दाखल

मुंबई : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर, मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भाजपचे मुंबई शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मलाबरहील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच लोढा यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा आहे. माझ्या मुख्यमंत्र्या अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचे सांगत संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती.
काय म्हणाले होते शिवसेना आमदार संजय गायकवाड
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवून अतिशय खालच्या स्थरावर जावून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात टीका केली होती. फडणवीस यांनी कोरोना वरून राजकारण करू नये असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी केली.ते शनिवारी बुलढाण्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर, मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य केले होते.
केंद्र सरकारने राज्यसरकारला मदत करायची सोडून पाकिस्तान, बांगलादेश ला मदत केली आहे. गुजरातला मोफत इंजेक्शन दिले. कोरोना काळात कोणीच राजकारण करून नये असेही गायकवाड म्हणाले.