‘राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, मोदींनीं गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली’

अजित पवार
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. शिवप्रेमींच्या निशाण्यावर राज्यपाल आले असून त्यांच्या हकालपट्टीची मागणी सुरू आहे.

अशातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. ‘राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो’, असं अजित पवार म्हणालेत.

ते म्हणाले, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना…” अशा शब्दात अजित पवार यांनी, कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *