|

कॉंग्रेसचे ते २३ नेते पुन्हा एकदा चर्चेत

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

जम्मूत शांती संमेलन घेऊन मांडली मते

जम्मू: कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नेमा अशी मागणी करणारे पक्षाचे जेष्ठ नेते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यातील काही नेते जम्मू मध्ये आयोजित शांती संमेलनात सामिल झाले आहेत. तेव्हा पुन्हा एकदा या विषयावरून चर्चेला उधान आले आहे. यातील काही नेत्यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या धोरणावर टीका केली आहे.  

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कॉंग्रेसच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा अशी मागणी केली होती. आमचा राहुल गांधी यांना विरोध नसून कॉंग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष द्यावा अशी मागणी करणारे पत्र त्या नेत्यांनी लिहिले होते. तसेच अध्यक्ष हा नेहमी उपलब्ध असायला हवा अशी सुद्धा मागणी पत्रात केली होती. मात्र, त्यापत्रानंतर मोठा गदारोळ उडाला होता. पत्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या मध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, मनिष तिवारी, मिलिंद देवरा आदी नेत्यांचा समावेश होता.

राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झालेले खासदार गुलाम नबी आझाद यांच्या निमंत्रणातून जम्मूतील काही नेते सामिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या धोरणावर कडाडून टिका केली आहे.

यावेळी बोलतांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले, कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. हे सत्य स्वीकारायला हवे. यामुळे आम्ही जम्मूत जमलो आहोत. हि गोष्ट फार पूर्वी करायला हवी होती. कॉंग्रेसला बळकटी मिळवीण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असेही ते त्यावेळी म्हणाले.

१९५० नंतर पहिल्यांदाच एकही प्रतिनिधी राज्यसभेत नाही. हि चुकीची गोष्ट आहे. हि सुधरायला हवी. मागच्या १० वर्षात कॉंग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. नव्या पिढीने पक्षाला जोडून घ्यायला हवे. आम्ही पक्षाचा सुवर्णकाळ पहिला आहे. आता मात्र उतारवयात कॉंग्रेसची उर्बलता पहायची नाही अशी भावना आनंद शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.   

एप्रिल, मे महिन्यात ५ राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राहुल गांधी बाबत काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *