Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचासुपरस्टार रजनीकांतला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सुपरस्टार रजनीकांतला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने ३ मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’  जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’

रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक १९७५ मध्ये वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल.’ कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. १९७८साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे ३५ फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला. अनेकजण त्यांची पूजा करत असले तरी ते स्वत: मात्र कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.

तामिळनाडू निवडणुकीच्या मुद्द्यावर जावडेकर म्हणाले…

हा पुरस्कार तामिळनाडूच्या निवडणुकींच्या संबंधित असल्याच्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, रजनीकांत यांचे चित्रपट इंडस्ट्रीमधील योगदानासाठी त्यांना हा सन्मान दिला जात आहे. याचा निवडणुकांशी काहीच संबंध नाही. दरम्यान तामिळनाडूमध्ये 6 एप्रिललला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments