खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल
माजी खासदारां विरोधात पोस्ट करणे पडले महागात
पुणे: माजी खासदारा विरोधात फेसबुक पोस्ट लिहिणे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भावाला चांगलेच महागात पडले आहे. सागर रामसिंग कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरोधात सागर कोल्हे यांनी फेसबुक वर अपशब्द वापरले होते. मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी फिर्याद दिली आहे.
नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पात पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मोठे बंधू सागर कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. यावरून सोशल मिडीवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. यामुळे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी फिर्याद दिली.
माफी मागितली नाही तर आंदोलन
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या कुटुंबावर संस्कार बिंबवायला कमी पडले, हे त्यांनी जाहीर करावे. त्यांच्या भावाने केलेल्या चुकी बद्दल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे शिरूर लोकसभा मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला आहे.