खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्रीबाबत ‘ही’ धक्कादायक बातमी समोर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या त्या मुंबईत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर या चंदीगड येथील भाजपच्या खासदार आहेत. ३१ मार्चला खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी उत्तर दिलं. याच दरम्यान त्यांनी किरण यांना ब्लड कॅन्सर असल्याचंही सांगितलं.
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच किरण खेर यांच्या या आजाराबद्दल माहिती मिळाली होती. तेव्हा त्या आपल्या चंदीगडमधील घरी होत्या मात्र, मल्टीपल मायलोमाबद्दल माहिती होताच त्यांना उपचारासाठी चार डिसेंबरला मुंबईला घेऊन जाण्यात आलं.
अद्याप अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा आहे, हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. बुधवारी ३१ मार्चला घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत बोलताना अरुण सूद म्हणाले, की ६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री खासदार किरण खेर यांना मागील वर्षीच आपल्या या आजाराबद्दल माहिती झालं होतं. उपचारानंतर आता त्या ठीक होत आहेत. याच कारणामुळे पुढील काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सूद यांनी सांगितलं.
अभिनेत्री किरण यांनी १९९० साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. इतकंच नाही तर बैरीवाली या बंगाली चित्रपटासाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे.