लोकसभेत शिंदे गटाला मान्यता दिल्यांनंतर शिंदे – बिर्लांची पहिलीच भेट

ओम बिर्ला
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. बिर्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आले असता शिंदेंनी त्यांची बी.के.सी. वांद्रे येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट घेतली.

यावेळी केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात सूरु असलेल्या अनेक योजना तसेच विकासकामे या संदर्भात शिंदेंनी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

यावेळी ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

मागच्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटानं लोकसभेत आपला गट हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शिंदे गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली होती. त्यांनतर राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी तर भावना गवळी यांची प्रतोतपदी निवड झाली होती.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *