Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचाहे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय, आनंद शिंदेंचा...

हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय, आनंद शिंदेंचा फडणवीसांना टोला

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी एका दिवसात ते तब्बल ६ प्रचारसभा घेणार आहेत. त्यांच्या प्रचारसभांना सुरुवात झाली असून त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. आता फडणवीसांच्या या वक्तव्याचा गायक आनंद शिंदे यांनी समाचार घेतला आहे. आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला. ‘ तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय. तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय. तुम्ही रडवताय पण आम्ही रडणार नाय. हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय ‘, असा टोला आनंद शिंदे यांनी लगावला आहे.
गायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळावेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच प्रेमाखातर आनंद शिंदे हे भारत भालके यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments