महाभारत बनवण्याची ही योग्य वेळ नाही
मिस्टर पर्फेक्षनिस्ट अशी ओळख असणाऱ्या आमिर खानची बहुप्रतीक्षित महाभारत ही वेब सिरीज न बनविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला महाभारत चित्रपटाच्या रूपाने प्रेक्षकांसमोर आणण्याचा विचार होता. परंतु नंतर त्याला वेब सिरीजच्या स्वरुपात निर्माण करण्याचे ठरवले होते.
बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली हे महाभारतचे दिग्दर्शन करणार होते. आमिरच्या म्हणण्यानुसार या वेब सिरीजवर काम करण्याची ही योग्य वेळ नाही. ही वेब सिरीज तयार करायला पाच वर्ष लागणार होते. यामुळे त्याला तीन चित्रपट गमवावे लागणार होते. सर्व संवेदनशील बाबी लक्षात घेऊनच या वेब सिरीजवर काम न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमिर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी तांडव या वेब सिरीज वर काही हिंदुत्ववादी संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत न्यायालय गाठले होते. यावर तांडवचे दिग्दर्शक आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ ने माफी मागितली आहे. ‘महाभारत’च्या बाबतीतही असे वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आमिरने ही वेब सिरीज रद्द केली असल्याची सिनेसृष्टीत दबकी चर्चा आहे.
आमिरच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट देखील चर्चेत आहे. हा चित्रपट ‘फ़ॉरेस्ट गंप’ या हॉलीवुड सिनेमाचा रीमेक असणार आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने त्याच्या यासिनेम्यातील लूक रीवील केला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.