हा देश म्हणजे तुमची खासगी मालमत्ता नव्हे

मुंबई: अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावर बोलताना हल्ला चढविला. उद्धव ठाकरे यांनी कोरोना, हिंदुत्व, केंद्र सरकार, शेतकरी आंदोलन, विदर्भ, सावरकर, औरंगाबाद आदी विषयांसंबंधित विरोधकांवर टिका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हा देश म्हणजे तुमची खासगी मालमत्ता नव्हे असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टिका केली. कोरोना रुग्ण वाढीबाबत केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालात राज्यावर टिका करण्यात आली आहे. याबाबत बोलतांना ते म्हणाले, नोटाबंदीत ज्यांनी स्तुती केली म्हणून त्यांची अध्यक्षपदी निवड केली होती. ते डॉक्टर आहेत मात्र अर्थशास्त्राचे हे लक्षात घ्यायला हवे. कोरोना रुग्णसंखे बाबत बिहारची सुद्धा तुलना केली आहे. बिहार मध्ये आकड्यात कशा प्रकारे घोळ घातले आहे हे आपण पाहिले आहेत. आकड्यासंबंधित सगळे अहवाल खरे आहेत. आकडे कधीही खोटे दिले नाहीत.
रुग्ण वाढत असतांना रेल्वे बंद करा अशी मागणी आठवडा भरा पूर्वीच केली होती मात्र ती मान्य करण्यात आली नाही. नंतर अचानक लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर मजुरांचे कसे हाल झाले हे आपण पाहिले आहे. त्यांच्यासाठी जे काही करता आले ते सर्व केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मदत करतांना मुख्यमंत्री साह्यता न करता पंतप्रधान फंडला मदत केली त्याबद्दल त्यांनी जोरदार टिका केली. कोणी प्रश्न विचारला कि देशद्रोही. प्रश्न विचारण्याची कोणाची ताकद नाही. हीच का लोकशाही असा प्रतिप्रश्न सुद्धा त्यांनी विचारला.
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर त्यांनी भाष्य करत आंदोलकांना आतंकवादी ठरविण्यात येत असल्याचे सांगितले. तारांच कुंपण सीमेवर असायला हवे होते ते शेतकऱ्यांच्या मार्गात लावण्यात येत आहे. चीनच्या सीमेवर जर ते लावण्यात आले असते तर चीन पुढेच आला नसता अशीही टिक त्यांनी यावेळी केली. जे विकेल ते पिकेल पेक्षा हमखास हमीभाव धोरण आणणार असल्याचे सांगितले.