कोरोना संसर्गात महाराष्ट्रातले ‘हे’ ८ जिल्हे देशात पहिले

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहीमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून गंभीर स्थितीचा सामना करावा लागतोय. संपूर्ण देश संभाव्य धोक्यात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असं देशातील सद्यस्थितीबद्दल नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.

याचबरोबर बहुतेक राज्यांमध्ये आयसोलेशन होत नाहीए. नागरिकांना घरीच वेगळं राहण्यास सांगितलं जातंय. पण यासाठी जी देखरेख ठेवावी लागते, ती खरंच होतेय का? जर हे शक्य होत नसेल तर त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणं आवश्यक आहे. दिल्ली या माध्यमातून संसर्ग नियंत्रणात आणण्यात सक्षम होती, असं राजेश भूषण यांनी सांगितलं.

देशात प्रामुख्याने १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक,औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे. आठवड्याचा राष्ट्रीय सरासरीचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६५ टक्के आहे. यात महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्के, पंजाबची ८.८२ टक्के, छत्तीसगड ८ टक्के, मध्य प्रदेशचा ७.८२ टक्के, तामिळनाडू २.५० टक्के, कर्नाटकचा २.४५ टक्के, गुजरातचा २.२ टक्के आणि दिल्लीचा २.०४ टक्के इतका आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

१ एप्रिल म्हणजे गुरुवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण करण्यात येणार आहे. ज्यांना लस घ्यायची आहे त्यांनी आधी http://cowin.gov.in यावर नोंदणी करावी. ज्यांना थेट केंद्रात जाऊन लस घ्यायची असेल त्यांनी दुपारी ३ वाजेनंतर जवळच्या केंद्रात जावं, असं राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं. थेट केंद्रात जाऊन नोंदणी करून लस घेणाऱ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सोबत न्यावं. याशिवाय तुम्ही बँकेचं पासबुक, पासपोर्ट किंवा रेशन कार्डही दाखवू शकता,असं भूषण म्हणाले.

भारतात २४ तासांत २७१ जणांचा मृत्यू

भारतात गेल्या २४ तासांत ५६ हजारांवर करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान ३७,०२८ जण करोनामुक्त झाले आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *