1983 वर्ल्ड कपच्या ‘या’ 5 गोष्टी कधीही विसरता येणार नाहीत…

39 वर्षापूर्वीची गोष्ट… नेहमी गजबज असलेल्या रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. सहा दिवसांपूर्वी दंगलीच्या कळा सोसल्यानंतर देखील सर्व दुकानं बंद होती. घराच्या लाईटी मात्र सुरू होत्या. एखादचं घर असायचं जिथं परिसरातील गर्दी जमली होती. कारण होतं वर्ल्ड कप…
वडिलांच्या नजरेत पुन्हा उभा राहू पाहणाऱ्या मोहिंदर अमरनाथच्या हातात बाॅल होता. मनात संतापाचा भावनेने मैदानात उतरलेल्या अमरनाथचे बाॅल फलंदाजाकडे वाऱ्याच्या वेगाने येत होते. बलाढ्य अशा वेस्ट इंडिजचे फलंदाज अमरनाथच्या चेंडू खेळण्यासाठी देखील तयार होत नव्हते. अमरनाथचे चेंडू थेट विकेटकिपरच्या दिशेने प्रस्तान करायचा.
धिप्पाड असा वेस्ट इंडिजचा मायकल होल्डींग फलंदाजी करत होता. तर दुसऱ्या बाजूने धाकड गोलंदाज गारनेर त्याला साथ देत होता. भारताचा कर्णधार कपिल देवने अमरनाथकडे चेंडू सोपावला. अमरनाथला आता अंतिम कार्य पुर्ण करायचं होतं. वाऱ्याच्या वेगाने अमरनाथने धाव घेतली आणि स्विंग करत चेंडू फेकला.
मायकल होल्डींगला काही कळण्याच्या आत चेंडू पॅडवर लागला. भारताच्या सर्व खेळाडूंनी जोरदार एलबीडब्ल्यूची अपील केली. अंपायरने बोट वर केलं आणि प्रेक्षक मैदानावर धावत सुटले. प्रेक्षकांनी सर्व खेळाडूंना उचलून घेतलं. उत्सवाचं कारण पण तसंच होतं, भारत पहिल्यांदाच विश्वविजेता बनला होता.
1983 चा वर्ल्डकपच्या आठवणी सांगाव्या आणि ऐकाव्या तेवढ्या कमी. सुनील गावस्कर, के श्रीनाथ यांच्यासारखे दिग्गज फलंदाज तर मदन लाल आणि बलविंदर सिद्धू यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज संघात होते. तर 7 ऑल राऊंडर्स घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला होता. विश्वकप जिंकेल अशी मनात अपेक्षा देखील नसताना भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं, ही सोधी सोपी गोष्ट नव्हती.
सुनिल गावस्कर फ्लाॅप पण श्रीकांतने तारलं-
वर्ल्ड कपमध्ये सुनिल गावस्करला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिज गोलंदाजांनी सुनिल गावस्करला झटपट बाद करण्याचा प्लॅन आखला. आणि त्यात त्यांना यश देखील मिळालं. सुनिल गावस्करने 12 चेंडूचा सामना केला. अँडी रोबोर्टचे बाॅल कधी खेळपट्टी क्राॅस करायचे फलंदाजाला देखील कळायचं नाही.
सुनिल गावस्करने अँडीच्या गोलंदाजीचा सावध मुकाबला केला. मात्र, एका इनस्विंग चेंडूवर गावस्कर आपला कॅच जेफ दुजोनच्या हाती देऊन बसले. भारताच्या फलंदाजीची आशा होती तो किरण फक्त 2 धावांवर मावळला. के श्रीकांतच्या खांद्यावर आता भारतीय संघाची जबाबदारी होती. श्रीकांतने जोरदार फटकेबाजी सुरू केली.
वेस्ट इंडिजच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांची श्रीकांतने धुलाई केली. 57 चेंडूत श्रीकांतने 38 धावांची खेळी केली. त्यात त्याने 7 चौकार आणि 1 षटकार खेचला. फायनलच्या सामन्यात भारताकडून खेळण्यात आलेली ही सर्वोच्च धावसंख्या होत्या.
संदिप पाटीलची अफलातून खेळी–
सुनिल गावस्कर, के श्रीनाथ आणि मोहिंदर अमरनाथ हे तीन भारतीय फलंदाज 100 धावांच्या आत बाद झाले. यशपाल शर्माच्या रूपात भारताला आणखी एक झटका बसला. त्यामुळे भारताची स्थिती 92 वर 4 गडी बाद अशी झाली होती.
अशातच संदिप पाटील नावाचा तरूण खेळाडू मैदानात पाय रोवून उभा होता. मोहिंदर अमरनाथ आणि कपिल देव यांच्यासोबत मिळून संदिप पाटीलने धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे चौकार आणि षटकार खेचणं अवघड होत होतं. त्यामुळे सिंगल्स आणि डब्ल्स घेत संदिप पाटीलने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. संदिप पाटीलने 29 चेंडूत 27 धावांची खेळी केली. त्यात त्याने 1 षटकार देखील खेचला. या सामन्यात भारताने 183 धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजांना पुर्ण 60 षटकं देखील खेळता आलं नाही.
बलविंदर संधूने पहिली आशा दाखवली–
भारताने 183 धावा केल्या. वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या होती. त्यामुळे वेस्ट इंडिज सारखा बलाढ्य संघ भारताला सहज हारवेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. पण भारताचा निश्चय पक्का होता. जिंकायचंच…
कपिल देवने सुरूवात केली. पहिल्यांदा गोलंदाजी करत मैदानाचा आढावा घेतला. त्यानंतर कपिलने बलविंदर संधूच्या हातात बाॅल पकडवला. बलविंदरने कॅप्टनला नाराज न करता पहिली विकेट काढून दिली. ग्राॅडन ग्रीनीजच्या रूपाने भारताला पहिला बळी मिळाला. ग्राॅडन ग्रीनीज म्हणजे जगातील महान फलंदाजांपैकी एक होता. ग्रीनीजच्या विकेटमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला.
विवियन रिचर्ड्सची विकेट-
वेस्ट इंडिजचा सलामीवीर ग्रिनीजची विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला तो विवियन रिचर्ड्स. विवियन रिचर्ड्स म्हणजे त्या काळातला जगातील बाप खेळाडू. गोलंदाजांच्या घामा फोडणाऱ्या रिचर्ड्सने वर्ल्डकपआधी भारतीय गोलंदाजांना लोळू लोळू धुतलं होतं. त्यामुळे विवियन रिचर्ड्स नावाची धास्ती प्रत्येक खेळाडूच्या मनात असायची.
फायनलमध्ये रिचर्ड्स धोकादायक बनू लागला. रिचर्ड्सने भारतीय गोलंदाज मदन लालला खास टार्गेट केलं. कपिल देवने मदन लालला ओव्हर देणं बंद केलं. त्यावेळी मदन लालने स्व:ता एक ओव्हर कॅप्टन कपिल देव कडून मागून घेतली. मी याला आऊट करू शकतो, असं विश्वासाने मदन लाल कपिल देवला म्हणाला. त्यावेळी कपिलने देखील मदन लालला ओव्हर दिली.
पहिले दोन बाॅल खेळू दिल्यानंतर मदन लालला आपला स्पेशल बाॅल टाकला. रिचर्ड्सने बाॅल मैदानाबाहेर भिरकवण्याच्या नादात बाॅल हवेत उचलला. मात्र,अपेक्षेप्रमाणे बाॅल बॅटला लागला नाही. त्यामुळे चेंडू हवेत उचलला गेला. डीप स्वेअर लेग आणि डीप मिड विकेटवर असणाऱ्या यशपाल शर्मा आणि कपिल देवने धाव घेतले. त्यावेळी कपिल देवने विवियन रिचर्ड्सचा झेल पकडला. आख्खं मैदान आनंदात होतं. पब्लिकने मैदानात घुसून कपिल देवला घेरलं आणि उचलून घेतलं.
मोहिंदर अमरनाथची विनिंग खेळी
मोहिंदर अमरनाथने संपुर्ण वर्ल्डकपमध्ये धुवांधार खेळी केली होती. तर आपल्या गोलंदाजीने देखील त्याने सर्वांची मनं जिंकली. याच कारणामुळे अमरनाथला मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात आलं. फायनलच्या सामन्यात अमरनाथने तीन मोठे विकेट घेतले तर 26 धावा करत मोलाची साथ देखील दिली होती.
हे ही वाचा की-
‘सखी सैयां तोह खूब ही कमात है’, अन् पौर्णिमाने केली 10 कोटी रुपयांची पोटगीची मागणी