लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध लागणार
पुणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील काही शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पालकमंत्री व अजित पवार यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यात पुण्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र वाढती संख्या पाहता कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगितले होते. तसेच नागरिक जर नियम पाळणार नसतील तर राज्यातील काही शहरात मात्र लॉकडाऊन लावण्यात येईल असा सूचक इशारा दिला होता.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी परिस्थिती नियंत्रणात असून लॉकडाऊन होणार नसल्याचे सांगत आले.
हे आहेत नवीन नियम
- ३१ मार्च पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.
- हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु राहणार
- कार्यक्रमांना फक्त ५० लोकांना परवानगी
- उद्याने संध्याकाळी बंद
- स्टॅालवर केवळ ५ जणांनाच परवानगी
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने धावणार