टाळ्या-थाळ्या खूप झाल्या, आता सर्वांना लस द्या-राहुल गांधी

दिल्ली: देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. काल दिवसभरात दीड लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरल आहे.
३६५ दिवसातही कोरोनाची लढाई जिंकता आली नाही. मोदिजी तुम्ही सांगितले होते. तुम्ही घंटी वाजवून घेतली. थाळ्या वाजवून घेतल्या. मोबाईलचे लाईट लावायला सांगितले. मात्र,कोरोना पुढे वाढतच गेला. दुसरी लाट आली. त्यात लाखो नागरिक शिकार झाले तुम्ही इव्हेंट बंद करा. ज्याला गरज आहे त्या सर्वाना लस द्या. आणि लसीची निर्यात थांबवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच गरिबांना पैशाची मदत करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेले अनेक दिवसांपासून राहुल गांधी यांनी लसीची निर्यात थांबवावी अशी मागणी लावून धरली आहे. सोमवारी ट्वीट करून पुन्हा एकदा लसीची निर्यात थांबवावी अशी मागणी केली आहे.
385 दिन में भी कोरोना से लड़ाई नहीं जीत पाए- उत्सव, ताली-थाली बहुत हो चुके अब देश को वैक्सीन दो! #SpeakUpForVaccinesForAll pic.twitter.com/YkIb3yDTGO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 12, 2021