राज्यात लसीचा तुडवडा नाही: आरोग्यमंत्र्याचे स्पष्टीकरण
मुंबई: राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नागरिकांनी कोरोनाचे नियम पालन करून सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा टोपे यांनी केले. राज्यात संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रेकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसारच काम केले जात आहे. राज्यात कोरोना चाचण्याची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी लक्षात घेऊन ही गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनी स्वयशिस्तीने नियम पाळावे असेही त्यांनी म्हटले आहे.
लसीचा तुटवडा नाही
कोरोनाच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहेत. १ मार्च पासून जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. याबाबत बोलतांना टोपे म्हणाले, राज्यात दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यात लसीचा तुटवडा नाही. खासगी आणि शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात करिता प्रयत्न केले जात आहे. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन टोपे यांनी केले