|

नियम पाळल्यास लॉकडाऊन नाही-आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाऊनला विरोधी पक्षा बरोबर इतर घटकाकडून विरोध करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करा अशा सूचना दिल्या आहे. यादरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संबधी मोठ विधान केले आहे. एबीपी माझाशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.

            हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडची संख्या आढळून येणारे कोरोना बाधित. आयसीयु आणि ऑक्सिजन बेड बाधितांना मिळाल्या नाही तर शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करण्यात येतो. नियम पाळून जर बाधितांची संख्या रोखू शकलो तर लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  स्टेप बाय स्टेप कडक निर्बंध करण्यात येत आहे. गर्दीचे ठिकाण बंद करण्याचा विचार आहे, सरकारने सांगितलेले नियम पाळले तर लॉकडाऊन होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागाशी चर्चा केली आहे. त्यामुळे अचानक निर्णय घेण्यात येणार नसल्याचे सांगितले.

            नागरिकांच्या बिनधास्तपणे वागण्यामुळे कोरोना वाढीत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. लहान घरातील होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांना क्वारंटीन सेंटर मध्ये ठेवायला हवे. सध्या लहान घरात असणारे रुग्ण तब्बेत बिघडल्यावर रुग्णालयात भर्ती करण्यात येत आहे. हे बदलायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लसीकरणासाठी तरुणानी पुढे यायला हवे

लसीकरणात वेग वाढवायचा आहे. सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जसा प्रयत्न करतो तसा लसीकरणासाठी करायला हवा. ४५ वर्षावरील लोकांना बूथ वरून बाहेर काढून लसीकरण केंद्रापर्यंत नेल पाहिजे. असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. लस, केंद्र, मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे सगळ्यांनी टीम वर्क करून लसीकरण पूर्ण करायला तरुणांनी मदत करायला हवी. असे राजेश टोपे यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *