जळगावच्या बातमीत कुठलेही तथ्य नाही
मुंबई: जळगाव मधील आशादीप महिला वसतिगृहातील तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या बातमीत कुठलेही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सभागृहात सांगितले.
घटस्फोटीत, पिडीत तरुणीसाठी हे जळगाव येथे आशादीप महिला शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात आहे. बुधवारी वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी नृत्य करायला लावल्याचे वृत्त आल्यानंतर मोठी खळबळ माजली होती.
यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ६ वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली होती.
या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आशादीप महिला वसतिगृहात कुठलेही गैरकृत्य घडले नाही. या वसतिगृहात १७ महिला राहत आहेत. घटनेसंदर्भात ४१ साक्षी नोंदविण्यात आले आहे. त्यात तरुणीचे कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
तसेच तक्रारदार महिला विरोधात तिच्या पतीने अनेक तक्रारी दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच ती महिला वेडसर असल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याचे त्यांनी सांगितले.
२० फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. काही महिला गरबा करत होते. एका महिलेने झगा घातला होता. गर्मी होत असल्याने तिने तो ते काढून ठेवला होता. महिला अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट दिली. त्यांची संपूर्ण माहिती घेतली. त्या रजिस्टर मध्ये नोंदी पाहिल्या त्यात कुठलेली तथ्य आढळून आले नाही. पोलीस कर्मचारी आत जावू शकत नसल्याचे चौकशीत समोर आल्याचे देशमुख यांनी सांगितले.