पुण्यात कोरोना बाधितांसाठी बेड शिल्लक नाहीत

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई होणार

पुणे: महाराष्ट्रात बुधवारी विक्रमी ३१ हजार ८५५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करूनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन १५ हजार ९८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २२,६२,५९३ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण २४७२९९ सक्रीय रुग्ण असू  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.२१% झाले आहे.

रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच बेड शिल्लक नसल्याची समस्या सुद्धा मोठी आहे त्यामुळे खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेडस्‌ स्वत:हून त्वरित कोरोना रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत, अन्यथा कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये, असा इशारा पुण्याच्या महापौरांनी रुग्णालयांना दिलाय.

कोरोना बाधितांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आता हेल्पलाईनवर सुरू झाल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि बेडचे नियोजन ही महापालिकेच्या दृष्टीने आता जिकिरीची गोष्ट झाली आहे. शहरातील रोजची तीन हजारांची वाढ पाहता यापैकी दोनशे ते तीनशे जणांना रूग्णालयांत दाखल करावे लागत आहे. त्यातील काही जणांना ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता भासते. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेड्स स्वत:हून त्वरित कोरोना रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत, अन्यथा कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये,असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासगी रुग्णालयांना  दिला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *