|

उच्च न्यायालयाच्या आदेशाला योगी सरकारची केराची टोपली

the-yogi-governments-banana-basket-to-the-high-court-order
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

लखनऊ : इतर राज्यांप्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीत सुद्धा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही उत्तरप्रदेश सरकार लॉकडाऊनच्या विरोधात आहे. काल अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःच उत्तरप्रदेशातल्या ५ शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला. मात्र योगी सरकार या विरोधात आहे. या विरोधात उत्तरप्रदेश सरकार सर्वोच्य न्यायालयात गेली आहे. योगी सरकारने यावर लवकरात लवकर सुनवाई करावी अशी मागणी केली आहे.
सलिस्टर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला लवकरात लवकर सुनवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही उपाय योजना केल्या आहेत व अजुन काही गोष्टी करण्यात येणार आहे. याला लॉकडाऊन हे उत्तर नाही. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या समोर सर्व प्रकारांची सुनवाई होणार आहे.

उत्तरप्रदेश मधील कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश मधील ५ शहरात लॉकडाऊन लागू केला होता. वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर, प्रयागराज आणि लखनऊ मध्ये २६ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद ठेवायचे आदेशात नमूद केले होते. आज संध्याकाळी होणाऱ्या सुनवाईत त्यावर सर्वोच्य न्यायालय काय आदेश देते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *