Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचा‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो - जितेंद्र आव्हाड

‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो – जितेंद्र आव्हाड

मुंबई: राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना पंढरपुरात विधानसभेची पोटनिवडणूक सुरु आहे. यात राज्यातील नेतेमंडळी वक्तव्य झाडतायत, अगदी बंदुकीच्या गोळ्यांसारखी. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप येण्याचे संकेत असलेलं वक्तव्य पंढरपूरजवळील मंगळवेढ्यात केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना करताना म्हटले आहे, तुम्ही फक्त समाधान आवताडे यांना निवडून द्या, ”सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो.”
दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी करेक्ट कार्यक्रम या शब्दावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.पंढरपूरच्या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द वापरला. पण हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. तो कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहेच, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची निवडणूक प्रचार बंदी लावण्यात आली आहे. त्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप नेहमीच मतांचं ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments