Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाक्वारंटाईन सेंटर मधून पळून जाताना ती अडकली खिडकीच्या गजामध्ये

क्वारंटाईन सेंटर मधून पळून जाताना ती अडकली खिडकीच्या गजामध्ये

पुणे: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका व्यवस्थापनावर कोरोनाचा मोठा ताण येतोय. प्रशासन सातत्याने नागरिकांनी सहकार्य करावे, नियम पाळावे असे आवाहन करत आहे. दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आली आहेत. त्याठिकाणी मिळणाऱ्या सुविधे बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, पुण्यातल्या एरंडवणामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. एका १८ वर्षाच्या मुलीने क्वारंटाईन सेंटरमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि ती खिडकीच्या गजामध्ये अडकली. दिप्ती कुमारी मूळची दिल्लीची असणारी ही मुलगी खिडकीच्या गजामध्ये अडकली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ही घटना घडल्यानंतर एरंडवणा अग्निशमन केंद्राचे अधिकारी व जवानांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत घाबरलेल्या मुलीला धीर देत हायड्रालिक कटरच्या मदतीने खिडकीचा गज तोडून मुलीची सुखरूप सुटका केली.

या मुलीला महिला सेवा मंडळाच्या व्यवस्थापिकेच्या ताब्यात दिलं गेलं आहे. डेक्कन पोलिस घटना स्थळी हजर होते. एरंडवणा अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर राजेश जगताप यांचे सहीत सब ऑफिसर संतोष कार्ले प्रभारी तांडेल यांनी महत्वाची भूमिका निभावली.

अशा घटना पुण्यातच घडत नसून जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सुद्धा १५ कोरोनाबाधितांनी क्वारंटाईन सेंटरमधून पोबारा केला आहे. दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांअभावी रूग्ण पळाल्याची चर्चा आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असून, या कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने अखेर या क्वारटाईन सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णांनी तिथून पळ काढला, असे सांगितले जात आहे. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा तपास पोलीस करत आहेत. यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांचीसुद्धा जामनेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments