युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील
कॉंग्रेस खासदार यांची राऊत यांच्यावर टिका
दिल्ली: युपीएच्या नेतृत्वावरून शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएच नेतृत्व करावी अशी मागणी केली होती. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टिका केली होती. शिवसेना युपीएच्या सदस्य नसल्याचे सांगितले होते. शुक्रवारी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्वावर टिका करत हा विषय दिल्लीतील असून तालुका स्थरावरील नेत्यांनी बोलू नये अशी टिका केली होती.
या प्रकरणात कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी उडी घेतली आहे. शुक्रवारी सातव यांनी ट्वीट केले असून युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील असे सांगितले आहे. “सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी, युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ” असे ट्वीट सातव यांनी केले आहे.
शरद पवार यांनी युपीएच नेतृत्व कराव यावरून नाराजी नाही. उलट कॉंग्रेस मधील काही जणांना पवार यांनी नेतृत्व कराव अस वाटत. युपीएच बळकट व्हाव अशी त्यांची इच्छा असल्याचे राऊत यांनी सांगितले होते.