‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दि. 29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करण्यात येणार आहे, असे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करण्यासाठी नियमितपणे माहिती प्राप्त व्हावी यासाठी अर्थ व सांख्यिकी विभागामार्फत वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब पोर्टलचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 29 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईचे सह संचालक पू.हि. भगूरकर यांनी दिली आहे.