रेमडेसिवीर चोरल्यावर चोराला झाला पश्चाताप, कौतुक करत जयंत पाटलांनी विरोधी पक्षावरही साधला निशाणा

The thief repented after stealing Remdesivir, Jayant Patil also targeted the opposition.
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : कोरोना रुग्णांसाठी काही प्रमाणात उपयोगी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचाही मोठा तुटवडा भासत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीरसारख्या औषधांसाठी अक्षरश: वणवण भटकत आहेत. अशातच औषधांचा काळाबाजार व साठेबाजीसारख्या अमानुष घटना समोर येत आहेत. त्यामुळं चिंता व्यक्त होत असतानाच हरयाणातील एका चोरानं नकळत चोरलेली करोना प्रतिबंधक लस परत केल्याची घटना घडली आहे.
हरयाणातील एका चोरानं हॉस्पिटलमध्ये काल रात्री चोरी केली. मात्र, आपण चोरी केलेली वस्तू दुसरं तिसरं काही नसून कोरोना प्रतिबंधक लस आहे हे त्यांच्या नंतर लक्षात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच त्यानं ही लस परत केली. लस परत करताना त्यानं सोबत एक चिठ्ठीही ठेवली. ‘सॉरी, मला माहीत नव्हतं की ही लस आहे’, असं त्यानं चिठ्ठीत नमूद केलं.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी या चोरानं लिहिलेली चिठ्ठी ट्वीट केली आहे. ‘माणुसकी जिवंत आहे’, असं जयंत पाटील यांनी त्याची चिठ्ठी ट्वीट करताना म्हटलं आहे. ‘कोरोनापासून माणसाचा जीव वाचवू शकणाऱ्या औषधांचा साठा आणि काळाबाजार जे करत आहेत, त्यांनी यातून धडा घ्यायला हवा ‘, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांचा रोख नेमका कुणाकडं आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

चोराला झाला पश्चाताप
कोरोना व्हॅक्सिनच्या १७०० लसी घेऊन पोबारा केलेल्या चोराला पश्तात्ताप झाला असून त्यानं या लसी परत केल्या आहेत. सोबत चोरी केलेला माल म्हणजे कोरोना लसी होत्या हे माहित नव्हतं अशी चिठ्ठी ठेवली आहे. हरयाणा मधल्या जिंदमध्ये गुरूवारी एका चोराने हॉस्पिटलमधल्या १७०० लसी चोरल्याची घटना घडली होती. “ माफ करा, करोनाशी संबंधित लसी यामध्ये होत्या याची मला कल्पना नव्हती ” असं त्या चोरानं चिठ्ठीमध्ये म्हटलंय. कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसींनी भरलेली पिशवी या चिठ्ठीसोबत चोरानं परत हॉस्पिटलमध्ये सोडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या चोराचा शोध घेत आहेत. काल, गुरुवारी दुपारच्या सुमारास जिंद मधील सिविल लाइन हॉस्पिटलच्या बाहेरच्या चहाच्या टपरीवर एका माणसाकडे ही पिशवी दिली. यामध्ये पोलिसांसाठी खाद्यपदार्थ असून मला अत्यंत तातडीच्या कामासाठी जायचं असल्याची विनंती त्या व्यक्तिनं संबंधित माणसाकडे केली. त्यानंतर हा सगळा उलगडा झाला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *