सरकार वाचविण्यासाठी बदल्यांच्या भ्रष्टाचाराकडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केले
बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक अधिकारी, राजकीय नेते
मुंबई: ठाकरे सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनातील बदल्याच्या रॅकेट बाबत पर्दाफाश केला आहे. गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालक यांना दिली होती. त्यानंतर ही सर्व माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. कारवाई होणे सोडाच रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे बदल्यांच्या रॅकेट विषयी संवेदनशील माहिती असल्याचे सांगितले. ही माहिती घेऊन दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिवांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे CBI ने यात चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलातील बदल्यासाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांची बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक यांना माहिती दिली.
पोलीस महासंचालक यांनी ही सर्व माही केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली आणि हे कॉल इंटरसेप्शनची मागणी केली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्फोटक माहिती मिळाली होती. बदल्याच्या रॅकेट मध्ये अनेक अधिकारी, राजकीय लोकांची अनेक नावे समोर आली होती.
रश्मी शुक्ला यांनी हा अहवाल २५ ऑगस्ट २०२० ही माहिती पोलीस महासंचालक यांना दिली होती. दुसऱ्या दिवशी ही माहिती पोलीस महासंचालक यांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिली होती. या सर्व प्रकरणाची सीआयडी कडून चौकशी करावी असे आपल्या अहवालात पोलीस महासंचालक यांनी लिहिले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही. ही माहिती बघितल्यावर गृहमंत्रालयाकडून कारवाई सोडाच गुप्तचर विभागाच्या आयुक्त यांची बढती रोखली असा आरोप फडणवीस यांनी केला.