राज्याला रुग्णसंख्येच्या तुलनेत रेमडेसिवीर, लस आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

The supply of remedicivir, vaccines and oxygen to the state is less than the number of patients; Learn the full stats
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १० मुख्यमंत्र्यान सोबत उच्च स्तरीय बैठक बोलविली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यात उपचार घेत असणाऱ्या कोरोना बाधितांची आकडेवारी, त्यांना लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन, १ मे पासून १८ वर्षा वरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. अशा वेळी १२ कोटी डोस लागतील असे सांगितले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन गरजेचे असल्याचे सांगितले.
रेमडेसिवीरच्या ७० हजार वायलची गरज
रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे वाटप रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी.

लसीकरणासाठी १२ कोटी डोसची गरज
राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. काल आपल्याकडे ६.५ लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३.५ लाख डोस वापरण्यात आले. तसेच २ लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार सद्यस्थितीत मी आपल्या सोबत बोलत असताना राज्यात सुमारे ५ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक.
लसीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ही ५ कोटी ७१ लाख असून त्यासाठी लसीकरणासाठी १२ कोटी डोसेसची आवश्यकता. आपल्या देशातील लस उत्पादक एवढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने त्याचा पुरवठा करू शकणार नाहीत. खासगी कॉपोरेटस् समूहांना सीएसआरच्या माध्यमातून उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी.
ऑक्सिजन
महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर
राज्यात ७६, ३०० ऑक्सिजन बेड्स
२५ हजार ००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला दररोज १ हजार ५५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता
३०० ते ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे.
राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल.
सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे. आपण रेल्वे मार्गाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता. केंद्र शासनाकडे आपण १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटीलेटर्सची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *