राज्य सरकार केवळ फेसबुक लाइव्ह मध्ये गुंग आहे: देवेंद्र फडणवीस

मुंबई: जनतेचा आवाज तुमच्या पर्यंत पोहचत नाही. राज्य सरकार केवळ फेसबुक लाइव्ह मध्ये गुंग आहे. गेल्या सव्वा वर्षापासून हेच होत आहे अशी टिका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
कोरोन काळात राज्य सरकारने मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणे याचा अर्थ सरकारने नेमका सांगितला आहे. सातत्याने कोरोना चाचण्या कमी केल्याने राज्यात कोरोना वाढला. राज्यात आजही गंभीर परिस्थिती आहे. अमरावती शहरात कोरोना टेस्ट पोझीटीव्ह देणारे रकेट आहे. नुसता सावळा गोंधळ आहे.
जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ५० टक्के सुद्धा रुग्ण यात सहभागी झाले नव्हते. जम्बो कोव्हीड लवकर बांधले असे सांगण्यात येते. मात्र ज्या वेगाने हे बांधले त्यापेक्षा जास्त वेगाने भ्रष्ट्राचार झाला आहे. ९० टक्के लाभार्थी फायदा मिळत असताना DBT बंद केली जात आहे. केवळ मलिदा खाण्यासाठी चांगल्या योजना बंद केल्या जात आहे. याचबरोबर गेल्या वर्षभरात आदिवासी खावटी योजनेचा फायदा दिला जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याच बरोबर शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यात बोंड आळीमुळे ९० टक्के नुकसान झाले आहे. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. मराठवाड्यात आवकाळीने नुकसान झाले आहे.
शिवसेनेचे संभाजीनगर बाबत दुट्टपी धोरण आहे. आमच्या सरकारमध्ये अनेक वेळा शिवसेनेचे मंत्री राजीनामे घेऊन येत होते. ते दिले नाहीत. मात्र औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण करा यासाठी कधी राजीनामे घेऊन आले नसल्याचे फडणवीस म्हणाले. सत्ता बदलली की भूमिका कशी बदलण्यात येते यामुळे लक्षात येते. शीख फॉर जस्टीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना पत्र लिहून नवीन राष्ट्र निर्माण करण्याची मागणी केली. अशा लोकांना थारा द्यायचा नसतो राज्य सरकारकडून कामांना स्थगिती देण्याचे काम सुरु आहे असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.