Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचायेत्या काही दिवसांत परिस्थिती बिकट होऊ शकते, नितीन गडकरींचा जनतेला इशारा.

येत्या काही दिवसांत परिस्थिती बिकट होऊ शकते, नितीन गडकरींचा जनतेला इशारा.

नागपूर: केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी नॅशनल कॅन्सर इंन्स्टिट्युट कोव्हिड सेंटरचे उद्घाटन समारंभात उपस्थित होते. या कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी लोकांना कोव्हिडच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला. दुसऱ्या लाटेत यापेक्षाही गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी तयार रहा असं ते यावेळी म्हणालेत. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
कोरोना व्हायरस आणखी किती खतरनाक होऊ शकतो आणि केव्हा पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही. सध्या कुटूंबचे कुटूंब कोव्हिडने ग्रस्त होत आहेत. येत्या १५ ते ३० दिवसात जास्त परिस्थिती बिकट होऊ शकते. आपण सर्वोत्तम विचार करावा परंतु कठीणातील कठीण परिस्थितीसाठीही तयार असायला हवे. या महामारीशी मुकाबला करण्यासाठी दीर्घ नियोजनाची गरज आहे. असे गडकरी यांनी यावेळी म्हटले.

जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध लावले जाण्याची शक्यता
कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. असं असताना सरकारने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी केली. कोविड १९ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं आहे. राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात संचारबंदी लावूनही लोकं नियमांचं उल्लंघन करून गर्दी करत आहेत. त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध लावले जाणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments