Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचामे महिन्यात सावली होणार गायब; जाणून घ्या 'शून्य सावली दिवसा'विषयी, राज्यात 'या'...

मे महिन्यात सावली होणार गायब; जाणून घ्या ‘शून्य सावली दिवसा’विषयी, राज्यात ‘या’ ठिकाणी अनुभवता येईल

मुंबई : येत्या मे महिन्यात राज्यातील सर्व शहरांना शून्य ,सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यात येत्या 3 मे पासून 31 मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस असणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. घराच्या अंगणात किंवा गच्चीत शून्य सावली दिवस अनुभवता येईल.

राज्यात कुठे आणि कधी अनुभवता येईल शून्य सावली दिवस

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगवेगळ्या वेळा आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी ही घटना एका वेळी दिसणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येईल. मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई, विरार या ठिकाणी 15 मे पासून 28 जुलैपर्यंत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. तर विदर्भात 15 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शून्य सावली अनुभवता येईल. त्यानंतर 17 मे रोजी अहेरी, आल्लापल्ली, 18 मे मुलचेरा, 19 मे पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 मे चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 मे चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, 22 मे बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, 23 मे खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रह्मपुरी, नागभीड, 24 मे शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर, 25 मे अमरावती, तेल्हारा, 26 मे नागपूर, भंडारा, परतवाडा, 27 मे परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे वरुड,नरखेड येथे शून्य सावली अनुभवता येणार आहे.

शून्य सावली दिवसाच्या घटनेमागचे शास्त्रीय कारण

सूर्य डोक्‍यावर असतो तेव्हा उन्हात व्यक्तीची अथवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता पायाखाली पडते; मात्र ज्यावेळी काही क्षण ही सावलीच गायब होते, या घटनेलाशून्य सावली असे म्हणतात.वर्षातून दोन दिवस असे येतात की, त्या दिवशी आपण राहतो ते ठिकाण सूर्य आणि पृथ्वीचा मध्य एका रेषेत येतात. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य अवकाशात बरोबर डोक्‍यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments