|

किक्रेट प्रेमींचा हिरमोड; आयपीएल 2021 स्थगित : बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला

of cricket lovers; IPL 2021 postponed: BCCI vice president Rajiv Shukla
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वृत्तसंस्था : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रसार झाला आहे. मात्र आयपीएलच्या मॅचेच अजूनही खेळल्या जात होत्या असे असताना कोरोनाने आयपीएलमध्ये प्रवेश केला असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक खेळाडूंना कोनोची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज ने एक मॅच न खेळण्याचा नकार दिला आहे. दरम्यान कोरोनाची वाढता प्रसार याचा विचार करुन आज बीसीसीआयने यंदाचे आयपीएल 2021 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

याआधी कोलकाता संघातील वरून चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोलकाता संघातील दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे 3 मे रोजी होणारा सामना रद्द करण्यात आला होता. सोमवारी सीएसकेचे २ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची राजस्थान रॉयल्सविरोधातील सामना खेळण्याची तयारी नसल्याचं चेन्नई सुपरकिंग्जने बीसीसीआयला नकार दिला होता. चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे बीसीसीआयने सर्व परिस्थिचा आढावा घेत आयपीएल 2021 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2021 करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *