कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलवली महत्वाची बैठक; या राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित

दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणे संदर्भातली परिस्थिती बिकट होत चालली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आपला नियोजित पश्चिम बंगाल दौरा रद्द केला असून ते सद्या महत्वाच्या बैठका घेत आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीत देशातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी देशातील १० राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेल बघल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पालानिस्वामी हे सहभागी होणार आहे.
ऑक्सिजन पुरवठा बाबत होणार चर्चा
देशात ऑक्सिजनचे पुरेस उत्पादनं होत आहे. तरी देशातील विविध ठिकाणी ते पोहचविणे आव्हान ठरत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान यासह अनेक राज्यांनी ऑक्सिजनची कमतरता भेडसावत आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी अनेक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यावर जोर देण्याचे आदेश दिले होते.