राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई: राज्यात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. जर लॉकडाऊन नाही केले तर परिस्थिती अवघड होईल. रुग्ण प्रचंड वाढत आहे त्यामुळे लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही. असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केले. कोरोनाच्यां पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
या बैठकीला, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष ठाकरे यावेळी उपस्थित होते.
लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. रुग्णसंख्या १५ एप्रिल नंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल त्यामुळे लॉकडाऊनची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या बैठकीत लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले. एक रुग्ण २५ जणांना बाधित करत आहे. त्यामुळे साखळी तोडणे गरजेचे आहे. जर कडक लॉकडाऊन केले नाही तर १५ एप्रिल नंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस कडून लॉकडाऊनला समर्थन देण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले कि, गुजरात मधील दोन कंपन्या रेमडेसिवीर बनवितात. फडणवीस यांनी ते मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर बँकेच्या हप्त्यात काही सवलत द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. तसेच लॉकडाऊन पूर्वी नागरिकांना वेळ द्यावा अशी मागणी या बैठकीत चव्हाण यांनी केली.
संपूर्ण लॉकडाऊन देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शविला होता. राज्यात रेमडेसिवीर तुटवडा जाणवत आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच मागच्या लॉकडाऊन मध्ये वीजबिल मोफत देण्याचे सांगितले होते. मात्र तसे झाले नाही बाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.