राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविली
मुंबई: राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. याबाबत सरकार कडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची गरज असल्याचे बोलण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख नेत्याची बैठक बोलविली आहे. कडक निर्बंध लावल्या नंतरही परिस्थिती बदलत नसल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहे. उद्या पुन्हा एकदा उपाययोजना बाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. त्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी उपस्थित होते. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन बाबत स्पष्ट संकेत दिले आहे. “राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता तीन आठवड्याच्या लॉकडाऊनची चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ५ लाख आहे. पुढील काही दिवसात ही संख्या १० लाख गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊन बाबत चर्चा होईल. या बैठकीत विरोधी पक्षाच मत जाणून घेण्यात येईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्यात ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित करावा ही मागणी आज मी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करणार आहे .
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) April 9, 2021
नागरिकांचा जीव अमूल्य आहे , ते वाचविण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागेल .#maharashtra #lockdown #covid_19 pic.twitter.com/OBmLQ3HJLm