पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ऐवजी लावला अभिनेत्रीचा फोटो
पुणे : जिल्हा परिषद येथे महिला दिनाचे औचित्य साधून स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. स्वाक्षरी फलकावर कर्तुत्वान स्त्रियांचे फोटो छापण्यात आले होते. त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र तो फोटो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा नसून त्यांची मालिकेत भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो लावण्यात आला होता.
हे प्रकरण समजल्यावर जिल्हा परिषद सभेत गोंधळ उडाला होता. या बाबत प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यानी दिलीगिरी व्यक्त केली. तसेच ही चूक कोणी केली याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे जाहीर करण्यात आल्या नंतर गोधळ कमी झाला.
जेव्हा हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला त्यावेळी सर्व सदस्य उभे राहिले. यावेळी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला. महिला सदस्या आशा भूचके, वैशाली गावडे, सुनिता पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी घडलेल्या प्रकारावर दिलीगिरी व्यक्त केली. तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये अशी तंबी प्रशासनाला दिली.
जिल्हा प्रशासनाचा खुलासा
या कार्यक्रमा जिल्हा परिषदेचा अधिकृत नव्हता. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांनी आयोजित केला होता. मात्र, यापुढे कोणतीही कार्यक्रम करण्यासाठी सामन्य प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. पुढच्या वेळी फोटोवरून गोंधळ होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना दाखवूनच फोटो घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहे.