कोरोनाचा प्रसार थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण ‘लॉकडाउन’ मात्र… : राहुल गांधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची परिस्थिती चिंता व्यक्त करणारी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामुळे मृत्यृच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे. स्मशानभूमी आता अपूरी पडू लागली आहे. आरोग्य सेवा-सुविधांवर मोठा ताण पडला आहे. ऑक्सिजन तुटवडा, ओषधांचा तुटवडा अशा अनेक समस्या तोंड वर काढून आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये रोज तीन लाखांच्या आसपास वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण लॉकडाउन हाच यावर पर्याय असल्याचे मत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
राहूल गांधी यांनी या आधी अनेक वेळा लॉकडाउनला विरोध केला आहे. मात्र आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी ट्विट व्दारे माहिती देताना सांगितले आहे. ते असेही म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण लॉकडाउन, मात्र मोदी सरकारला हे लक्षात येत नाही. देशात लॉकडाउन न लावून सरकार सर्वसामान्याचा जीव घेत आहे. असे त्यांनी आज व्टिट केले आहे.
राहुल गांधी यांनी याआधी सुद्धा अनेक वेळा सरकारला सतर्क केले मात्र त्यांचे बोलणे कोणीच मनावर घेतले नाही त्याचे परिणाम देश आतासुद्धा भोगत आहे. त्यामुळे यावेळेस सरकार राहुल गांधी यांचा सल्ला ऐकणार ते पहावे लागणार आहे.
GOI doesn’t get it.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2021
The only way to stop the spread of Corona now is a full lockdown- with the protection of NYAY for the vulnerable sections.
GOI’s inaction is killing many innocent people.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून तीन लाखांच्या आसपास कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध सुद्धा लावलेले आहेत मात्र तरी सुद्धा कोरोनाआळा बसत नाही त्यामुळे कडक लॉकडाउनची मागणी होत आहे.