‘घोडचुका सुधारणार की? देशाची वाट लावतच राहणार’

मुंबई: केंद्र सरकारने लहान बचत योजनावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२०-२२ च्या पहिल्या तिमाहीत लहान बचत योजना वरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत असल्याने व्याज दर कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करून केंद्र सरकारला घोडचुका कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार असा प्रश्न विचारला आहे.
गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार? https://t.co/lfViwwkjjM
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 1, 2021
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.
लहान बचत योजनावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णयावर कॉंग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी, खासदार सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी आणि जयंत पाटील यांनी सुद्धा टिका केली होती.