मंत्री गर्दी करून धुडगूस घालत आहेत-मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मुंबई: “राज्य सरकार मधील काही मंत्री हे गर्दी करून धुडगूस घालत आहेत मात्र सरकार मराठी भाषा, शिवजयंती साजरी करायला नकार देत आहे. आणि जर तुम्हाला कोरोनाच संकट येतंय अस वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अश्या शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारला खडसावले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होत. परंतु, कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्ण संख्या बघून राज्य सरकारने मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमाचे आयोजन दादरमधील शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर राज बोलताना म्हणाले, सरकारला जाग अशे दिवस आल्यावरच का येते? त्यांना अस बोलावच कस वाटत. वर्षभरापासून यांच्या हातात सरकार आहे. मग का होत नाहीत या गोष्टी. या मुद्द्यात राजकारण कसलं. इच्छा असेल तरच ते शक्य आहे,” अस राज ठाकरे या वेळी म्हणाले.
पुढे राज ठाकरे जनतेला आवाहन करत म्हणाले, “स्वाक्षरीची हि मोहीम पहिल्यांदा होत नसून याआधी ही झाली आहे. माझी सर्व मराठीजनांना विनंती आहे कि, आपली स्वाक्षरी हि कुठेही गेल्यावर मराठीतच करा तस केल्याने मराठीतून काहीतरी केल्याचे मनात राहत. मी स्वताः मराठीत सही करतो. बँकांमध्ये सुद्धा मराठीत सही करायला हवी. तसेच, दक्षिणात्य माणसाबद्दलच नाही. सगळ्यानबद्दलच बघा. दोन गुजराती जेव्हा एकत्र येतात.. तेव्हा ते गुजराती मध्ये बोलतात. पण मराठी माणूस जेव्हा अमोरा समोर येऊन बोलतात तेव्हा अनेकदा हिंदीमध्ये बोलतात,” अस म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.