सचिन वाझे यांना चालविणारा व्यक्ती सरकार मध्ये
मनसुख हिरेन प्रकरण सुद्धा NIA कडे द्यावे
दिल्ली: सचिन वाझे प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. दररोज नवीन खुलासे होत आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सचिन वाझे यांच्या कडून जप्त करण्यात आलेली मर्सिडीज भाजप नेत्याची असल्याचा आरोप केला होता. आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर मोठे आरोप केले आहे. तसेच सचिन वाझे हे केवळ एक प्यादा असून त्यांना चालविणाऱ्या राजकीय व्यक्तीवर कारवाई व्हावी असा आरोप त्यांनी केला आहे.
सचिन वाझे यांना चालविणारे लोक सरकार मध्ये बसले आहे. त्यांची चौकशी कोण करणार. तपास यंत्रणांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता त्या राजकीय व्यक्तींना शोधायला हवे. ती व्यक्ती सरकार मध्ये कितीही मोठ्या पदावर बसले असेल त्यांच्यावर तपास यंत्रणांनी कारवाई करावी.
२०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मंत्री सचिन वाझे यांच्यावरची निलंबनाची कारवाई थांबवून त्यांना पोलीस दलात घ्यावे अशी मागणी केली होती. मात्र मला त्यांचा भूतकाळ माहित असल्याने त्यांना नाकारले. कोरोना काळात पोलीस दलात मनुष्यबळाची कमी असल्याचे सांगून घेण्यात आले. मात्र तसे नसून त्यांना वसुली अधिकारी म्हणून घेण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवून त्यांना संदेश द्यायचा होता.
कोरोनाचे कारण देऊन फक्त वाझे यांनाच परत घेण्यात आले. २०१७ मध्ये त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. असे असतांना त्यांना मोठ्या पदावर कशासाठी बसविण्यात आले. कुठलेही मोठी केस असेल तर वाझे तेथे दाखल होत होते. पोलीस आयुक्त नंतर सचिन वाझे यांचे पद होते असे ते वागत. मुख्यमंत्री, अनेक मंत्र्याचा प्रेस कॉन्फरन्सला ते उपस्थित राहत. त्यांना वसुली अधिकारी म्हणूनच बसविले होते. त्यांच्या काळात डान्स बार चे प्रमाण वाढले होते. मनसुख हिरेन यांना ते ओळखत होते. शवविच्छेदन अहवालात त्यांना मारून टाकल्याचे दिसते.
मनसुख हिरेन प्रकरण सुद्धा राष्ट्रीय तपास यंत्रणेला द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दहशत विरोधी पथकाकडे पुरेसे पुरावे असतांना त्यानी कारवाई केली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तर गृहमंत्रालय तीन जण चालविता.
तीनही पक्षात समन्वय नाही. आमचा संबंध नाही असे सगळेजण दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले