राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन – मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यात १ मे पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मे नंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन पुढे वाढविण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली होती. १५ मे पर्यंत लॉकडाऊन ठेवल्यास फायदा होईल असे तज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डीस्टन्सिंग पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय आहेत. त्यामुळे १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.